मुंबई :- व्हॉईस ऑफ मिडीया (Voice of Media) या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा कोकणस्तरीय मेळावा खोपोली (जि. रायगड येथे शनिवार, दि. 15 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. कोकणस्तरीय मेळाव्याच्या लोगोचे आज ‘देवगिरी’ बंगला येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे नेते खासदार सुनील तटकरे, राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
यावेळी युवा नेते सनी मानकर, शेखर पिंगळे, अंकित साखरे, व्हॉईस ऑफ मिडीया राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा दैनिक कोकण प्रजा संपादक फिरोज पिंजारी, राष्ट्रीय संघटक पत्रकार खलील सुर्वे आदी उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)