रामटेक :- लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरुवंदन सोहळा भव्य विदर्भस्तरीय शाहीर कलाकार मेळावा नुकताच कामठी येथील श्रीराम जानकी मंगल कार्यालय येथे ४ जुलै रोजी पार पडला. भारतीय कलाकार शाहीर मंडळ व सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसर भंडारा द्वारे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान या सोहळ्यामध्ये किरणापुर येथील भीमशाहीर प्रदीप बागवान कडबे यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तथा प्रमाणपत्र देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कामठी येथे हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ४ जुलै रोजी ताटात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार देवराव रडके , काँग्रेसचे नरेश बर्वे , रामटेक विधानसभा क्षेत्राचे चंद्रपाल चौकसे , कवी ज्ञानेश्वर वाकुडकर , गणेश देशमुख , शाहीर राजेंद्र बावनकुळे , ब्रह्मा नवघरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. दरम्यान भारतीय कलाकार शाहीर मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बावनकुळे व सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसर जिल्हा भंडारा चे अध्यक्ष गणेश देशमुख यांच्या हस्ते शाहीर प्रदीप बागवान कडवे यांचा प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे सूत्रसंचालन शाहीर सुरज नवघरे यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन नरेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन सुरज नवघरे यांनी केले. याप्रसंगी विदर्भातुन अनेक शाहीर मंडळींनी सदर मेळाव्याला हजेरी लावली होती.