– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई
नागपुर :- ग्रामिण जिल्हयात मोटरसायकल चोरींच्या घटना वाढत असल्याने त्यावर आळा घालण्या करीता पोलीस अधिक्षक विशाल आनंद नागपुर ग्रामिण यांनी दिलेल्या सुचने वरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांनी त्याकरीता विशेष पथक स्थापन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचे अनुषंगाने गुप्त बातमीदारांकडून एक संशयित इसमा बद्दल माहिती प्राप्त झाली. त्यानुसार दिनांक ०४/०७/२०२३ रोजी सदर पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे अरोली परिसरातुन पथकाने सापळा रचून संशयीत इसम १) अविनाश राजू गजबे रा. लापका ता. मौदा ह. मु. रायपूर हिंगणा याला ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातून चोरी केलेली एक मोटर सायकल जप्त करून पोलीस ठाणे अरोली येथील मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. त्याने विचारपुस दरम्यान सदर मोटर सायकलीची चोरी ही पैशांची आवश्यकता असल्याने केल्याचे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातुन एक काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मो. सा. क्र. MH ३६ ९८४९० किंमती अंदाजे ५००००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाणे अरोली अप. क्र. २१७/२३ कलम ३७९ भा.द.वि. गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील तपास कामी पोलीस ठाणे अरोली यांचे ताब्यात दिलेले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन अरोली करीत आहेत.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरिक्षक अनील राउत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, इकबाल शेख, पोलीस शिपाई अभिषेक देशमुख, राहूल साबळे, चालक मोनू शुक्ला यांनी पार पाडली.