-चार्जिंगवरील मोबाईल लंपास
नागपूर :-मोबाईल चोरल्यानंतर तो त्याच परिसरात फिरत होता. कदाचित तो दुसरा डाव साधण्याच्या तयारीत असेल. दरम्यान सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय मरापे यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्याला पकडले. महाबली झारिया (26) रा. मंडला (मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
रेल्वेस्थानकावरील फलाट क्र.-1 येथील प्रतिक्षालयात एका प्रवाशाने 16 हजार रुपये किमतीचा चार्जिंगला ठेवला होता. प्रवाशांची नजर चुकवित महाबलीने मोबाईल लंपास केला. प्रवाशाने लगेच आरपीएफ ठाण्यात धाव घेतली. चौकशी केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोदविला.
यावेळी एएसआय विजय मरापे यांच्यासह उपनिरिक्षक बदनसिंह मीना, सागर लाखे, कुंदन फुटाने, सचिन सिरसाट मनोज मेश्राम यांनी स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये मोबाईल चोरणारा आरोपी दिसून आला तसेच तो पार्किंग परिसरात फिरत असल्याचेही स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याच्याजवळ मोबाईल फोन आढळला. तरी सुध्दा तो समाधान कारक उत्तर देत नव्हता. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. दरम्यान मोबाईलवर कॉल येत असताना तो फोन उचलत नव्हता. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.