नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसीएशन च्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना सामूहिक निवेदन सादर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- देशात होत असलेल्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे निर्माण होत असलेल्या अडचणी व ऑनलाइन औषधीमुळे तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता तसेच नागपूर केमिस्ट सदस्यांना महानगर पालिका प्रशासनच्या वतीने एलबीटीच्या जुन्या प्रकरणात नोटीस पाठवण्यात येत आहेत ज्यामुळे सदस्यांना नाहक डोकेदुखी होत आहे याप्रकारच्या समस्यांशी अवगत करणे हेतू नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष राजीव उखरे यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच विधानपरिषद सदस्य प्रवीण दटके यांना सुद्धा निवेदित करण्यात आले.

निवेदन देताना शिष्टमंडळात उपाध्यक्ष श्याम चरोडे,उपाध्यक्ष दिनेश कुकरेजा,दत्ता खाडे,पवन मदान,अनिल अप्पा,कैलास लखाणी आदी केमिस्ट बंधू उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जुनी कामठी पोलिसांनी शिकवले सायबर शिक्षणाचे धडे 

Mon Jun 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आजच्या आधुनिक युगात ऑनलाइन आर्थिक व्यवहार चे प्रमाण वाढले आहेत त्यातच सायबर गुन्ह्यातही वाढ होत आहे तेव्हा सायबर गुन्ह्याची माहिती व्हावी व नागरिकांनी या सायबर गुन्ह्याला बळी न पडो यासाठी जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कामठीतील भीसी लाईन, नागसेन नगर, मोदी पडाव येथील महिलांना जुनी कामठी पोलीस स्टेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com