पोलीस स्टेशन खापाची कार्यवाही
सावनेर :-दिनांक ०४/०६/२०२३ रोजी पोलीस स्टेशन खापा येथील पोलीस स्टाफ हे सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे खापा हद्दीतील २०४ किमी अंतरावर खुवाळा शिवार येथे यातील आरोपी क्र. १) नामे- सूनिल पंढरी डोंगरे, २) अनिल देवराव खूबाळकर ३) वासूदेव भास्कर वाडकर तिन्ही रा खूबाळा यांनी खूबाळा गावातील उच्च प्राथमिक शाळेलगत असलेल्या सार्वजनिक मालमत्ता असलेल्या नाल्याची बंदीस्त पार फोडल्यामुळे पावसाळयामध्ये नाल्याला पूर येवून नाल्याच्या पाण्याची दिशा बदलण्याची शक्यता असल्याने ते पाणी गावातील अथवा लोकांच्या शेतामध्ये जावून एखादया वेळेस शेतातील पिक उत्पन्नाला नुकसान होवून उत्पन्नामध्ये घट होवू शकते व नाला फोडल्यामुळे आजूबाजूस राहणार्या लोकांना सामायिक पणे नुकसान व धोका होवू शकतो याबाबत माहीती असतांना देखिल आरोपी क्र. १,२ व ३ यांनी संगणमत करून वरील नाल्याची पार फोडुन शासनाचे नुकसान करून वरील आरोपी व सोबत आरोपी क्र. ४) हल मोहटे रा. खापा ५) अमोल उदाराम अडकणे यांनी ट्रक व ट्रॅक्टरच्या साहाय्याने वरील नाल्यातील सुमारे २०,००,०००/- रू किंमतीची २००० बास रेती चोरून नेले तसेच आरोपी क्र. ५ यांनी सदर रेती चोरून नेण्यासाठी वरील आरोपीतांना सहकार्य केले.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे देविदास पांडुरंग आंबोरे, वय ३३ वर्ष रा. तहसिल कार्यालय सावनेर यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापा येथे आरोपीताविरुध्द कलम ३७९, ४२७, २६८, ४३० सहकलम सार्वजनिक मालमत्ता अधि १९८४ कलम ३ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खडसे हे करीत आहे