संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिव पंचायत मंदिर जवळील येरखेडा येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने,नगदी 5 हजार रुपये असा एकूण 29 हजार 700 रुपयाची घरफोडी केल्याची घटना काल सायंकाळी 7 वाजता निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रमोद डोंमकुंडवार वय 55 वर्षे रा शिव पंचायत मंदिर समोर येरखेडा कामठी यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 454,380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी च्या घरात काल सायंकाळी 7 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून घरात सुरक्षित ठेवलेले 24 हजार 700 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी 5 हजार रुपये असा एकूण 29 हजार 700 रुपयाची चोरी केली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.