नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (ता.५ जून) रोजी शोध पथकाने ६४ प्रकरणांची नोंद करून ३२,३०० रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकण्याप्रकरणी ( रु २००/- दंड ) या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत २७ प्रकरणांची नोंद करून १०,८०० रुपयांची वसुली करण्यात आली.कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून रु २४०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत ३ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीच्या व्यावसायिकांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. १०००/- दंड) या अंतर्गत ३ प्रकरणांची नोंद करून रु ३००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून रु २६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास २ प्रकरणांची नोंद करून रु २००० दंड वसूल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६४ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com