जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

पारशिवनी :- यातील फिर्यादी नामे- रूपाली जितेंद्र पांडे वय २४ वर्ष रा. भामेवाडा त कुही यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. पारशिवनी येथे अप. क्र. २९५ / १९ कलम ३०२ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

फिर्यादी व आरोपी नामे गणेश गोविंद बोरकर वय ४० वर्ष, रा. वडोदा ता. कुही हे नातेवाईक असुन आरोपी हा फिर्यादीचा मोठ्या बहिणीचा पती आहे. फिर्यादी ही आपले माहेरी बारवारी येथे आई वडीलांकडे बाळंतपणाकरीता आली असता फिर्यादीची मोठी बहीण प्रतीभा हिचा आरोपी पती हा घरी आला व त्यांचे सासरचे लोकांना त्याची पत्नी प्रतिभा हिला सासरी कुही येथे का पाठवत नाही याचा राग मनात धरून बोलत असताना यातील फिर्यादीच्या एक महिन्याचा नाव न ठेवलेला मुलगा याला घेवुन आरोपीस समजाविण्याकरीता गेली असता आरोपीने फिर्यादीच्या लहान मुलाला चाकुने भोसकुन जिवानिशी ठार केले.

सदर प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक विलास काळे पो.स्टे. पारशिवनी यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्टाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक २२/०५/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे. अली सा. नागपूर यांनी वरील नमुद आरोपीस कलम ३०२ भादवि मध्ये आजिवन कारावास व ५००० /- रू दंड, दंड न भरल्यास ०१ वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी तपासे सा. यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन सफी / ६९० किशोर निबांळकर पो.स्टे. पारशिवनी यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भिवापुर येथील पेट्रोल पंप चालकाच्या हत्येचे रहस्य उलगडले मुलीनेच केला वडीलाचा खून

Wed May 24 , 2023
नागपूर :-दिनांक १७/०५/२०२३ चे सकाळी १०.०० ते १०.३५ वा. दरम्यान भिवापुर ते नागभिड रोड वर असलेले भारत पेट्रोल पंप (पाटील पेट्रोल पंप) चे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के रा. दिघोरी नागपूर हे रात्री विक्री झालेल्या ईधनाचे पैशाचा हिशोब करीत आपल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते या दरम्यान एक मोटार सायकलवर आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन तिन इसम पेट्रोल पंपावर आले आपली गाडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com