नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार ता. 10) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे साई गणेश स्टोर्स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच अग्रवाल किराणा स्टोर्स यांच्या विरोधात फूटपाथवर मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा प्रदर्शित केल्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे श्री साई किराण स्टोर्स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोन अंतर्गत ग्यानचंदानी बिल्डर्स यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.