132 घरकूल लाभार्थ्यांना भूखंड वाटप बाबत मार्गदर्शन व चर्चा
रामटेक – गटविकास अधिकारी संदिप गोडशलवार यांनी ग्रामपंचायत खैरीबिजेवडा , मनसर आणि कान्द्री येथे भेट देऊन सदर ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल कामांची , जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली तसेच ग्रामपंचायत कान्द्री इथे अतिक्रम मधे असलेल्या 132 घरकुल लाभार्थ्यांना शासनाअंतर्गत देण्यात येणाऱ्या भूखंडाची पाहणी करून सदर ग्रामपंचायत ला योग्य कार्यवाही संदर्भात मार्गदर्शन केले . तसेच प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कोरोना लस टीकाकरन संदर्भात आढावा घेऊन ग्रामपंचायत मनसर इथे स्वतः बुस्टर डोस घेऊन जनतेला लस घेण्याकरिता प्रोत्साहित केले .कान्द्री सरपंच परमानंद शेडे ,उपसरपंच मनजीत बहेलीया, ग्राम विकास अधिकारी नरेंद्र गाडगे,शुभम खडसे (ग्रामीण गृहनिर्माण अभियंता)