कोदामेंढी :- मौदा हे तालुक्याचे ठीकाण असून,कोदामेंढी, नांदगाव व परिसरातील नागरिक, शासकीय व नीमशासकीय कर्मचारी त्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहनाने मौदा येथील तहसील कार्यालय व पंचायत सामिती कार्यालयात जाण्यासाठी नांदगाव ते राजोली या मार्गाचा अवलंब करतात.तर कोदामेंढी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन कान्वेंट, तीन टू व्हीलर शोरूम व मोठी बाजारपेठ असल्याने राजोली व परिसारातील नागरिक राजोली ते नांदगाव या मार्गाचा अवलंब करतात. परंतु मागील एक वर्षापूर्वीपासून या मार्गाची अत्यंत दुरावस्ता झालेली आहे. या अंदाजे 2 किमी रस्त्यावर 200 ठिकाणी खड्डे पडले आहेत, खड़डयांच्या भोवताल गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या रस्त्यावर जान्यायेण्याचा अनुभव घेतलेले कोदामेंढी ग्रामपंचायत उपसरपंच गोपाल गिरमेकर, सदस्या अनीता हटवार सह कोदामेंढी,नांदगाव,राजोली व परिसरातील त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.
नांदगाव ते राजोली रस्त्याची हालत खस्ता, वाहानधारक त्रस्त
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com