मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपुरात आगमन..

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या लोकार्पण सोहळ्याला राहणार उपस्थित

नागपूर दि.26 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले.

२७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जामठा परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचा लोकार्पण सोहळा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 

मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार कृपाल तुमाने, आमदार अॅड आशिष जायस्वाल, विभागीय

आयुक्त विजयलक्षमी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर-

पालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनीही त्यांचे स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मुख्य इमारतीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

Thu Apr 27 , 2023
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मुख्य इमारतीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.  Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!