स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर :-स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.१८) ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात १ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच ४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी, टिळक चौक येथील जैन प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर टी पॉईंट येथील बालाजी फूड अँड नास्ता पॉईंट यांच्याविरुध्द सिवेज लाईन नसल्याप्रकरणी व स्वयंपाकगृह अस्वच्छ आढळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत नारा, शामभाऊ नगर येथील आर. के. एस. पब्लिक स्कूल यांच्याविरुध्द विद्युत खांबांवर विनापरवानगी जाहिरात बॅनर लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोरक्षण आणि गोरक्षक 

Wed Apr 19 , 2023
नागपूर :- गोरक्षणाच्या नावाखाली राज्य व केंद्र सरकारकडून करोडो रुपयांचे अनुदान लाटणाऱ्या धंतोली येथील गोरक्षण करणाऱ्या संस्थांची व त्यातील गोमातांची? दशा काय आहे हे या चित्रावरून लक्षात येते. नागपुरात 32 च्या वर तापमान असताना या सरकारी गोमाता? मात्र दिवसभर खुल्या मैदानात उन्हात तापत असतात. यांच्यासाठी कुठेही सावलीची व्यवस्था नाही. जुन्या गोरक्षण च्या ठिकाणी तात्पुरते शेड आहे. पण या शेड च्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com