– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- पोलीस स्टेशन बुट्टीबोरी अंतर्गत येणान्या रूईखैरी परीसरात राहणारे सराईत गुन्हेगार कुलदीपसिंग लखनसिंग बावरी वय २७ वर्ष व मयुर उर्फ एन. डी. कृष्णाजी राऊत वय २९ वर्ष दोन्ही रा. रुईखेरी ता. जि. नागपूर हे मागील काही वर्षापासून साईखेरी व बुट्टीबोरी परिसरात गुंडगिरी करून तेथील नागरिकांना त्रास देत होते. ते नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेले असायचे त्यांनी रुईखेरी बुट्टीबोरी एमआयडीसी बुट्टीबोरी व नागपूर शहर परिसरात चोरी, सरफोडी, जबरी चोरी, जबरी चोरी करून दुखापत करणे, कट खुन खुन करून त्याचा पुरावा नष्ट करणे, महिलांना फुस लावून पळवून नेवुन त्यांचेशी जबरी संभोग करणे, दुखापत करून लोकांना जिवे मारण्याची धमकी देणे व स्वत: जवळ प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगुन गंभीर दुखापती पोहचविणे यासारखे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत. त्यांच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाच्या लोकांमध्ये ते आपले स्वतःची भीती निर्माण करून दहशत पसरवित होते. नागपूर ग्रामीण पोलीसांना त्यांचेविरुद्ध जेवा जेव्हा तकारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवून त्या दोघांचेही विरुद्ध गुन्हे नोंद करून त्यांना अटक करून कारागृहात पाठविले आहे. परंतु कुलदीपसिंग लखनसिंग बावरी वय २७ वर्ष व मयुर उर्फ एन. डी. कृष्णाजी राऊत वय २९ वर्ष दोन्ही रा. रूईखैरी ता. जि. नागपूर यांचे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्यांचेविरुद्ध प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु त्यांनी आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरुच ठेवली. त्यांचे कृत्य सामाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण कडुन MPDA कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दि. १२/०४/२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांनी कुलदीपसिंग लखनसिंग बावरी वय २७ वर्ष व मयुर उर्फ एन. डी. कृष्णाजी राऊत वय २९ वर्ष दोन्ही रा. रुईखेरी ता. जि. नागपूर यांचे विरुध्द स्थानबध्दता आदेश काइला असुन त्यानुसार त्यांना मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, भिमाजी पाटील, ठाणेदार पो.स्टे. बोरी, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, निलेश बर्वे, विजय डोंगरे, संजय बांते यांनी पार पाडली.
@ फाईल फोटो