स्त्रियांसाठी नागपुर शहरातील संपुर्ण मार्केटात स्वच्छ प्रसाधन गृहाची, ई टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणी

नागपुर : मोरया फाउंडेशनच्या वतीने शहरातील बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाही, काही ठिकाणी शौचालयाला दरवाजे नाहीत, ती तुटलेल्या अवस्थेत आहे. काही महिला शौचालय मधे असामाजिक तत्वाचे लोकं येऊन बसतात, पाण्याची नीट व्यवस्था नाही या सर्व कारणामुळे महिला अश्या शौचालयात जाऊ शकत नाही. तेव्हा वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठेत ई टॉयलेट प्रणाली सुरु करावी. आज आपलं शहर स्वच्छ व सुंदर नागपूर म्हणून गणल्या जात परंतु शौचालय बघून अजुनही आपण ग्रामीण मधे राहत असल्याची जाणीव निर्माण होते. G-20 अंतर्गत आपल्या नागपुर शहराचे सौंदर्यीकरण झाले आहे. तेव्हा महिलांचे स्वच्छतागृह सुद्धा सुंदर आणि स्वच्छ दिसायला पाहिजेत, त्यामुळे महिलांचे आरोग्य सुदृढ राहील. या आमच्या मागणीची अमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी. हिच आमची महाराष्ट्र शासनाला मागणी आहे. यावेळी जिल्हाधिका-यांनी बर्डी, इतवारी, महाल, सक्करदरा आणि जरीपटका या एरियात अमलबजावणी करतो असे आश्वासन दिले. मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका रजनी अविनाश चौहाण, माधुरी इट्टेडवार, स्विटी मांडवगडे, कोमल पिसार आदींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन

Wed Apr 12 , 2023
नागपूर :- राज्यपाल रमेश बैस यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने दिल्लीहून आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यंवशी, पोलीस अधीक्षक(ग्रामीण) विशाल आनंद यांनीही राज्यपालांचे गुलाबपुष्प देवून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com