नागपूर :- नागपूर शहराच्या पाणी प्रश्नावर महानगर पालिका आयुक्तांना भेट मागण्यासाठी नागपूर शहर मनसे तर्फे १० पत्र देउन भेटीची वेळ मागितली असता कोणतही उत्तर न मिळाल्यामुळे आज शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदु लाडे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त यांची आरती करुण आगळवेगळ आन्दोलन करण्यात आल या प्रसंगी टाळ,ढोलच्या गजरात ही आरती करण्यात आली व आक्रमकपणे आन्दोलन करण्यात आले या आन्दोलनाला यश आले व आयुक्तानी २५ एप्रिल ला पाणी प्रश्नावरील सर्व मागण्या ऐकून घेऊ व तात्काळ त्या सर्व मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पाणी प्रश्न आक्रमकपणे शहर मनसे लाऊन धरेल असे शहर अध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात आले.याप्रसंगी शहर मनसेतील शहर उपाध्यक्ष उमेश बोरकर, शहर सचिव श्याम पुण्यानी, घनश्याम निखाडे, महेश जोशी शहर सहसचिव दुर्गेश साकुलकर, गौरव पुरी विभाग अध्यक्ष प्रशांत निकम, उमेश उतखेडे, अंकित झाडे, अभिषेक माहुरे, सुरेश पाटिल, चेतन बोरकुटे महिला विभाग अध्यक्ष स्नेहा खोब्रागडे,कोमल गुरघाटे,रचना गजभिये , सुनिता कैथल व मोठ्या संख्येने पधाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
२४x७ पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक.. आयुक्त भेट नाकारत असल्यामुळे केले तीव्र आंदोलन.. पोलिस प्रशासनाची मध्यस्थी.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com