संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
-आत्महत्येचे केले फेसबुक लाईव्ह
कामठी ता प्र 4 :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी विवाहित तरुणाने घरमंडळीपैकी कुणीही घरी नसल्याचे संधी साधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री दीड दरम्यान घडली असून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कृतांक डोंगरे वय 21 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे तर या आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण विडिओ करून आत्महत्या केली हे इथं विशेष!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असून पत्नी ही माहेरी असून आई अनमोल डोंगरे ह्या नातेवाईकाकडे बाहेर गावी गेल्या होत्या तर वडील व भाऊ तसेच बहीण ही नागसेन नगर च्या मूळच्या घरी झोपले असता घरी कुणी नसल्याचे संधी साधून सदर मृतक कृतांक डोंगरे ने अज्ञात कारणावरून कुंभारे कॉलोनी च्या राहत्या घरात फेसबुक लाईव्ह करून दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नसले तरी आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी च्या श्वविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे आई,वडील,पत्नी ,एक लहान भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.