मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
सण उत्सव शांततेत सलोख्याने साजरे करा पो. निरिक्षक कदम यांचे नागरिकांना आवाहन.
कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या परिसरातील पत्रकार, पोलीस पाटील व प्रतिष्ठीत नागरिकांची सण उत्सवानिमित्य शांतता समितीची बैठक घेऊन येणारे सण उत्सव शांततेत सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाव्दारे पोलीस निरिक्षक यशवंत कदम हयांनी नागरिकांना शासनाच्या नियमानुसार केले आहे.
शुक्रवार (दि.३) मार्च ला सकाळी ११.३० वाजता पोलीस स्टेशन कन्हान येथे होळी, धुलिवंदन, शबे ए बारात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रंगपंचमी आदी सणउत्सवा निमित्य शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशंवत कदम यांच्या मार्गदर्शनात पार पाडली. बैठकीत प्रमुख पाहुणे वरिष्ठ पत्रकार एन. एस. मालवीय, काॅंग्रेस नेते दयाराम भोयर, जि प माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर, टेकाडी ग्रा पं सदस्य सतीश घारड, विद्युत अभियंता पी.बी. ओमकार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. होळी उत्सवादरम्यान महिलांचे अंगावर रंग, पाणी फेकणे, महिलांची छेडछाड, विनयभंग करणे, रंग पाण्याचे फुगे मारल्याने होणारे अपघात, विविध मर्यादे पेक्षा ध्वनिप्रेक्षपांचा वापर, गाण्याच्या तालावर करण्यात येणारे नृत्य, अंगविक्षेप मस्जिदीवर गुलाल, रंग फेकणे, जातीवाचक घोषणा देणे, पोलीसांना शिवीगाळ करणे, होळीसाठी लाकडे चोरून नेणे, हुडदंग मचविणे आदि कारणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशंवत कदम यांनी शासनाच्या नियमानुसार शांतता समितीच्या बैठकीत सुचना करून नागरिकांनी सण उत्सव शांततेत सलोख्याने साजरे करण्याचे कडकडीचे आवाहन केले आहे. याप्रसंगी सर्व पत्रकार बंधु, दुर्योधन ठाकरे, अजय ईखार, विजय सोनवाने, गुंडेराव चकोले, सुरेश काकडे, ईश्वर राऊत, पुरुषोत्तम दोडके, अरविंद गजभिये, संदीप नेऊल, श्रीकृष्ण कुथे, संतोष ठाकरे, शालु हरडे, संजय नेवारे, पुंडलिक कुरडकर, अकरम कुरैशी, सुनिल सरोदे, शकीफ शेख, भुषण इंगोले, फिरोज मोहम्मद, रिंकेश चवरे, आकिब सिद्धिकी, अजय कापसीकर सह मान्यवर नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.