अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या पदव्युत्तर पदविका निसर्गोपचार व योगशास्त्र अभ्याक्रमाच्यावतीने 3 व 4 मार्च, 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ योगतज्ज्ञ डॉ. सूर्यकांत पाटील हे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
सुदृढ व निरोगी आयुष्य जगण्याकरीता योग शिक्षण प्रणाली नवसंजीवनी ठरत ओ. आजार झाल्यावर योगासनाकडे न वळता आजारच होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून योगाभ्यास उपयुक्त आहे. परंतू जर आजार जडला, आणि योगाभ्यास शक्य होत नसेल, तर अशा वेळी विविध साहित्याच्या मदतीने योगाभ्यास केल्यास शरीर क्रियात्मक होऊन शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम होण्यास मदत मिळते आणि याबाबतची माहिती या द्विदिवसीय कार्यशाळेत ज्येष्ठ योगतज्ज्ञ डॉ. सूर्यकांत पाटील हे देणार आहेत. या कार्यशाळेला विद्यार्थी, कर्मचारी तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे.