नागपूर :-सुख शांती समाधान संस्थेच्या वतीने बुधवार 22 फेब्रुवारी पासून तर 5 मार्च 2023 पर्यंत सकाळी ६ ते ७ या वेळेत शेष नगर येथील, बाल हनुमान मंदिर समाज भवन खरबी रोड येथे निःशुल्क योग शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात संधीसंचालन, शरीर संचालन, विविध आसनं, प्राणायाम, ओंकार शिकविल्या जातात. अतिशय शांतपणे मधुर वाणीने सांगितलेले आसनं प्रात्यक्षिकासह करून घेतल्या जातात. सावकाश पद्धतीने आसनं केल्यामुळे शरीराच्या अंतर स्नायूंना खूप आराम होतो. व शरीरात असलेल्या व्याधी निश्चितच दूर होतात. तसेच आजारानुसारही असणं घेतल्या जातात. त्यामुळे प्रत्येकच शिवर शिबिरार्थी हा आनंदी आणि समाधानी होऊन संस्थेची जुळून राहतो. तसेच सुप्त गुणांना जागृत करून त्यांच्या प्रगतीकरण कसे करायचे हे सांगून त्याचा व्यक्तिमत्व विकासही होतो. संस्थेचे अध्यक्ष आणि योगगुरु सचिन माथुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे. व स्वतःचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास, करून घ्यावा. हि संस्था हे कार्य गत 15 वर्षापासून अखंडितपणे निःशुल्क, निस्वार्थपणे, सेवाव्रती होऊन करीत आहे. यासाठी आपल्या संयोगाची अपेक्षा आहे. असे शीला केळापुरे यांनी एका पत्रकात म्हटले आहे .
सुख शांती समाधान संस्थे तर्फे 22 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान निःशुल्क योग शिबिराचे आयोजन .
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com