मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) : – संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी नागपुर जिल्हा संस्थापक सचिव अजय धोपटे, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे यांच्या हस्ते संगीता वांढरे कार्याध्यक्षा रामटेक विधानसभा क्षेत्र महीला आघाडी पदावर नियुक्ती करण्यात आली. तर जागृती पडोळे यांची अध्यक्ष कांद्री शहर महीला आघाडी, दुर्गा सरोदे उपाध्यक्ष कांद्री महिला आघाडी, मीरा आंबीलडुके सहसचिव कांद्री महिला आघाडी पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच मीना कळंबे यांची अध्यक्षा कन्हान शहर महिला आघाडी,सविता डांगरे सहसचिव कन्हान शहर महिला आघाडी पद्दी नियुक्ती करण्यात आली. वरील सर्वांना नियुक्तीझाल्याबद्दल व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिभा कुंभलकर अध्यक्षा पारशिवनी तालुका व नगराध्यक्षा नगर परिषद पारशिवनी, कामिनी हटवार कार्याध्यक्ष मौदा तालुका महीला आघाडी, अमोल साकोरे अध्यक्ष युवा आघाडी रामटेक विधानसभा क्षेत्र श्रीराम हटवार उपाध्यक्ष नागपुर ग्रामिण, संजय बडवाई अध्यक्ष युवा आघाडी दक्षिण नागपुर, अरविंद नरंड, भगवान सरोदे, योगेश आखरे, आयुष देशमुख, यशवंत आंबिलडुके, शुभम वांढरे, सुरज कळंबे सह इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.