संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात विविध ले आऊट धारकानी मोठ्या प्रमाणात ले आउट पाडले असून प्लॉट विक्रीचा व्यवसाय थाटून बसले आहेत.परंतु प्लॉट विक्री करण्यापूर्वी नियमानुसार त्या ले आउट मध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा न करता भूखंडाची विक्री करीत असल्याने बहुतांश ग्राहकांची फसवणूक होत आहे.
वास्तविकता ले आउट मालकाने या भूखंडात प्रशस्त डांबरी रस्ते,इलेक्ट्रिक डी पी, पोल, आकर्षक लाईट, पाण्याकरिता बोअरवेल, पक्क्या नाल्या असे आश्वासन देऊन भूखंडाची विक्री सुरू आहे मात्र प्लॉट धारकानी प्लॉट घेऊन बरेच महिने, वर्ष लोटून गेले मात्र नमूद सोई सुविधा ले आउट मध्ये अजूनही न दिल्याने बहुतांश प्लॉटधारक आजही या सोयी सुविधांपासून वंचित आहेत.
आयुष्यात प्रत्येकाला आपल्या निवाऱ्याची सोय करावी लागते याची सुरुवात एखादा प्लॉट वा घर घेतल्यापासून केली जाते. आपल्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून पै पै करीत गोळा केलेला पैसा हा प्लॉट खरेदीत केला जातो इतकेच नव्हे तर बँकेतुन कर्ज घ्यावे लागते मात्र येथील भूमाफिया बोगस एन ए च्या नावावर बोगस प्लॉट विक्री केल्याने कित्येकाचा विश्वासंघात करून आर्थिक फसवणूक करीत आहेत. नागपूरला लागून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी तालुक्यातील रणाळा, घोरपड, कोराडी, महादुला, बिडगाव ,खैरी,भिलगाव, म्हसाळा ,येरखेडा,, महालगाव, कापसी, वडोदा, तरोडी यासारख्या अनेक गावात अनधिकृत ले आउट धारकानो नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या स्वार्थासाठी सुपीक जमिनींना अकृषक करण्यासाठी परवानगी काढण्याचा सपाटा सुरू केला आहे व एकीकडे अकृषक जमिनीचा परवाना मिळाला नसला तरी बोगस एन ए प्लॉट विक्री च्या नावावर बोगस प्लॉट विक्रो चा गोरखधंदा जोमात सुरू झाला असून एकच प्लॉट अनेकांना विकुन सर्वसाधारण प्लॉट धारकांची सर्रास फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. यामध्ये कामठी तालुक्यात बोगस प्लॉट विक्रो जोमात सुरू आहे.
ग्रामीण भागात शेत जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत अनेक बिल्डर्स मालक ले आऊटला (एन ए) अकृषक न करता प्लॉटची विक्री करीत आहेत जमिनीला (एन ए) अकृषक करण्यासाठी तेरा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अकृषक चे प्रमाणपत्र घ्यावे लागत असते त्याबाबत शासनाला लाखो रुपयांचा महसूल निधी प्राप्त होतो अकृषक जमिनीवर लेआऊट पाडताना संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील सरपंच, सचिवाकडून लेआऊट मंजूर करून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतो लेआउट ला मान्यता देण्यापूर्वी लेआउट मध्ये रोड ,रस्ते ,नाल्या ,पिण्याच्या पाण्याची सोय ,विजेचे खांब ह्या मूलभूत सोयी सुविधा, सोबतच सार्वजनिक उपयोगासाठी बाग-बगीचा व सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृहाची जागा सोडली असेल तरच ग्रामपंचायत कडून मान्यता देण्यात येते परंतु अनेक ग्रामपंचायतचे सरपंच सचिव नियम धाब्यावर बसवून महसूल बुडवून लेआउटला मान्यता देत आहेत आजही कामठी तालुक्यात हजाराचे वर लेआऊटआहेत या लेआउट मध्ये रस्ते ,नाल्या, पानी, विजेची सोय नाहीत अनेक लेआउट मध्ये रस्ते ,नाल्या नसल्यामुळे सांडपाण्याची डबके साचले आहेत त्यामुळे त्या परिसरात डेंग्यू मलेरिया रोगाची न(साथ पसरत असते. आजही अनेक लेआऊट मध्ये पायी चालणे कठीण आहेत अनेक वाहनधारक अर्ध्या किलोमीटर अंतरावर गाड्या ठेवून रात्रीला अंधारात पायपीट करीत घरी जात आहेत अनेक लेआउट मध्ये बिल्डर्स ने लेआऊट मधील सार्वजनिक उपयोगाच्या बाग-बगीचा व संस्कृतीक सभागृहा करिता सोडलेली मोकळी जागा विकून हडप केले आहेत काही लेआउट मालकांनी बिल्डर्सनी एकाच प्लॉट दोन दोन व्यक्तीला विकण्यायाच्या घटना सुद्धा उजेडात आल्या आहेत अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला पडल्या आहेत अनेक बिल्डर्स मालकाकडून जमिनीचा बयान पत्र करून टोकन देऊन लेआउट पाडून कागदपत्री दाखवून कमी भावात विकत असल्याचे दाखवून सामान्य नागरिकांची फसवणूक करीत आहेत तेव्हा कामठी तालुका महसूल प्रशासनाने यावर कंबर कसने तितकेच गरजेचे आहे.
-कामठी तालुक्यात विविध ले आउट धारकांनी ग्राहकाना भूखंड विकण्याआधी नागरिकाना येथे ज्या सुविधा उपलब्ध पाहिजे त्या सुविधा उपलब्ध न करता भूखंडाची विक्री सुरू केली आहे मात्र यात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने पुढाकार घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे
@ फाईल फोटो