संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी उच्च माध्यमिक (बारावी) परिक्षा मंगळवारपासून (दि.२१) शांततेत सुरू झाली. सेठ केसरिमल कनिष्ठ महाविद्यालयांत ही परीक्षा घेतली जात असून परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तासह दक्षता समिती नजर ठेवून आहे. या केंद्रामधून (४१० केन्द्र क्रमांक) एकूण ६५२ परीक्षार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रब्बानी कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय, नूतन सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, झाप्रुजी बाविस्कर पावनगाव कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या केंद्रावर केंद्र संचालकम्हणुन प्रा डॉ सुधीर अग्रवाल परीक्षा संचालनाचे काम सांभाळीत आहेत.
परीक्षेतील पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाच्या विभागाची भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी बारावीची परीक्षा शांततेत व्हावी यासाठी विशेष दक्षता घेतली व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.