20 पासून महाराष्ट्रभरातील विद्यापीठ, महाविद्यालये बंद
अमरावती :- महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय तसेच सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या तिस-या टप्प्यात बुधवारी विद्यापीठातील सर्व कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. गुरुवारी 16 फेब्राुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असून कर्मचा-यांच्या मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नाही, तर 20 फेब्राुवारीपासून महाराष्ट्रभरातील विद्यापीठे, महाविद्यालये कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.
आज विद्यापीठातील कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10.20.30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय तसेच माहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचायांना लागू करणे, सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचायांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचायांना दिनांक 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचायांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचायांना जुनी पेंशन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचायांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे.
आंदोलनाच्या तिस-या टप्प्यात बुधवारी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. तर गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असून यानंतरही शासनाने मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर 20 फेब्राुवारीपासून राज्यभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील कामकाज ठप्प पडणार हे निश्चित.