संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-येथील रमानगर भागात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले यांनी राष्ट्रीय मतदार दिवस बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधाना द्वारे दिलेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत माहिती देऊन प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी रंजीत कटकवार, रंजना कटकवार, श्रद्धा रामटेके, रोहित रामटेके, पुष्पकला कठाने, सुनिल कठाने, तुषार भोंडे, प्रितम भोंडे, कुलदीप शेंडे,दिगलाल महानंद, सूरज नेवारे, आदित्य बंसोड, मोहित बंसोड, मनिषा बंसोड या मतदार यादीत नाव नोंदविलेल्या नव मतदारांना राज्य निवडणुक आयोगाचे मतदार कार्ड देण्यात आले तसेच अठरा वर्ष पुर्ण करणाऱ्या नवमतदारां चे मतदार नोंदणी चे अर्ज (फॉर्म 6)भरण्यात आले विक्की बोंबले,कृष्णा मैंद,किशोर शर्मा, रामकृष्ण ऊके, राजेश पाटील, विरेंद्र राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.