नागपुर – जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर कार्यरत. मंगलवारपासून 9pm to 6am नागपुरात जमावबंदीची कडक अंमलबजावणी जाहीर. सर्व दुकाने, आस्थापना, बंद करा, यात्रा, कार्यक्रम, लग्न रात्री ९ पर्यतच होतील : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी,महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांची आरोग्य यंत्रणेसोबत तातडीची बैठक. ओमायक्रोन संसर्ग रोखण्यासाठी नागपुरातही रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी घोषित.
रुग्ण संख्या वाढ झाल्यास वैद्यकीय पूर्वतयारीसाठी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा. आयजीएमसी, मेडिकल कॉलेज, एम्स सर्व ठिकाणच्या कोविड वार्डची जिल्हाधिकारी आर. विमला, सीईओ योगेश कुंभेजकर यांच्याकडून पाहणी.