दहा वर्ष जुने आधार कार्ड करावे लागणार अद्यावत

गडचिरोली : दस्ताऐवज अद्यावतीकरण बायोमेट्रीक प्रमाणिकरणासह रहिवाशींची ओळख पटविण्यांच्या तरतुदीसह आधार हा ओळखीचा सर्वांत व्यापकपणे स्विकारलेला पुरावा म्हणून उदयास आलेला आहे. रहिवाशांना सरकारी सेवाचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी रहिवाशांना नवीन आणि अद्यावत तपशिलासह आधार सादर करणे आवश्यक आहे. अशे रहिवाशी ज्यांना 10 वर्षाहून अधिक काळ आधार कार्ड मिळालेला आहे परंतू त्यांनी कदाचीत आधार अपडेट केले नसेल अशा रहिवाशांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन त्यांचा पत्ता पुनश्च सत्यापीत करणे आवश्यक आहे. मार्गदर्शक तत्वे दिनांक 19 सप्टेंबर, 2022 च्या कार्यालयीन ज्ञापनाव्दारे प्रसारीत केली गेली आहेत. जी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी संबंधीत जिल्ह्यातील प्रलंबित कागदपत्रे अद्यावत करण्यांचे उद्दिष्ठ निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये 4,38,461 दस्ताऐवज अपडेट करणे आवश्यक आहे. तरी ज्यांना आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेत, दरम्यान त्यांनी अपडेशन केलेले नाहीत अशा नागरीकांनी ओळखीचे व पत्त्यासंबंधी दस्ताऐवज सादर करुन अद्यावतीकरण करुन घेणेबाबत जिल्हा प्रशासनाकडून आव्हान करण्यांत येत आहे.

18 वर्षावरील व्यक्तीचे नव्याने आधार कार्ड बनविण्यांस निर्बंध

ज्या नागरीकांचे 18 वर्ष वय पुर्ण होऊनही आजस्थितीस आधार नोंदणी केलेली नाही अशा नागरीकांना आधार नोंदणी करणेकरीता निर्बंध घालण्यांत आलेले आहेत. ज्या नागरीकांचे 18 वर्षपुर्ण होऊनही आधार नोंदणी केलेली नाही अशा नागरीकांनी तहसिल स्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आवश्यक दस्ताऐवजासह अर्ज करावे. सदर दस्ताऐवजाची पडताळणी केल्यानंतरच त्या नागरीकांना आधार नोंदणी करणेबाबत सल्ला देण्यांत येईल. सदर नागरीकांनी आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल.

मुलांचे आधार अपडेट कधी कराल ?

0 ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांनी आधार नोंदणी केलेली आहे अशा बालकांनी दर पाच व दहा वर्षांनी बॉयोमेट्रीक अपडेट करणे अनिवार्य आहे. वयानुसार बोटांचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यामध्ये बदल होत असल्याने बायोमेट्रीक अद्यावत असणे आवश्यक आहे. अन्यथा मुलांचे आधार कार्ड हे बायोमेट्रीक अद्यावत न केल्यास निष्क्रीय होऊ शकतात.

आधार सेवांचे दर-

नवीन आधार नोंदणी-मोफत

डेमोग्राफीक अद्यावतीकरणासह किंवा त्याशिवाय अनिवार्य बायोमेट्रीक अद्यावतीकरण – मोफत

बायोमेट्रीक अद्यावतीकरण डेमोग्राफीक अद्यावतीकरणासह किंवा त्याशिवाय- 100/- रु.

डेमोग्राफीक अद्यावतीकरण- 50/- रु.

दस्ताऐवज अद्यावतीकरणाकरीता आधार सेवा केंद्रावर यासाठी रु. 50/- दर किंवा myAadhaar portal वरुन ऑनलाईन दस्ताऐवज अद्यावत केल्यास रु. 25/- शुल्क यु.आ.डी.ए.आय. यांनी निश्चित केले आहे.

हे महत्वाचे

• आधार कार्डमध्ये नाव दोन वेळा बदलता येतो.

• जन्मतारीख केवळ एकदाच बदलू शकता.

• लिंग बदलही केवळ एकदाच शक्य आहे.

• ही मर्यादा ओलांडल्यानंतरही बदल करायचा असल्यास यु.आय.डी.ए.आय. चे मदत क्रमांक 1947 ला संपर्क करावे.

 

 

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चाचा नेहरु बाल महोत्सवातील कबड्डी सामन्यात बालगृह घोट येथील मुलींनी पटकवला प्रथम क्रमांक

Wed Jan 11 , 2023
गडचिरोली : महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या मार्फत जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुला मुलींमध्ये एकमेकांविषय बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव व क्रिडा स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर बाल महोत्सवात अहिल्यादेवी बालसदन घोट,केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय घोट,जि.प.म. गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविदयाल घोट,प.पु. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com