डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने माध्यमक्षेत्रातील मार्गदर्शक हरपला -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने माध्यमविश्वातील एक मार्गदर्शक हरपला. आपले विचार संयतपणे मांडून त्यावर ठाम राहणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी लेखक, निवेदक आणि पत्रकार आपण गमावला आहे,’ अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘विश्वास मेहेंदळे केवळ एक लेखक नव्हते. ‘ पाच सरसंघचालक’ ‘यशवंतराव ते विलासराव’, ‘आपले पंतप्रधान’ ही त्यांची गाजलेली काही पुस्तके आहेत. पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी ते एक संस्था होते. संयतपणे आणि विचारांवर ठाम राहत निःपक्षपाती पत्रकारिता कशी करता येते, याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कामातून शिकवण दिली. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तुझे आहे तुजपाशी - परि जागा तू चुकलासी

Mon Jan 9 , 2023
बऱ्याचदा असं होतं की आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्या जवळपासचं असते पण त्यासाठी आपण सगळ्या जगाला वेढा मारून येतो… मी इतके वर्षे झाले तिरुपती बालाजीला सलग दरवर्षी जातो आणि त्याचं श्री बालाजीचे एक नितांत सुंदर, अफाट, अद्वितीय असे मंदिर आपल्याचं महाराष्ट्रात अगदी हाकेच्या अंतरावर आहे… मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर… आपल्या महाराष्ट्रात औरंगाबाद पासून १५० किमी, शेगांव पासून केवळ ९० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com