मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ;उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न – जयंत पाटील

मुंबई :- यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ ठरत आहे असा आरोप करतानाच शिल्लक तांदूळ अथवा उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर शाळा प्रशासन करत आहेत याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत केंद्राचे लक्ष वेधले आहे.

कॉन्ट्रॅक्टर, टेंडर प्रक्रिया, धान्याचा वेळेत पुरवठा न होणे असे बरेच मुद्दे समोर येत आहेत. मात्र मूळ मुद्दा हा आहे की, त्याचा थेट परिणाम मध्यान्ह भोजन योजनेवर आणि आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांवर होत आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे जिल्हा परिषद शाळांना आधुनिक स्वरूप देण्याचा स्थानिक पातळीवर प्रयत्न आम्ही करत आहोत. तर दुसरीकडे मुख्य आधार असलेली ही योजना ढिसाळ नियोजनामुळे कोलमडत आहे. राज्यसरकारने तात्काळ हस्तक्षेप करून या योजनेतील त्रुटी दुरुस्त कराव्यात असे आवाहन करतानाच विद्यार्थी घडला तरच समाज घडेल! याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री ज्योतिबा देवस्थानाची 400 एकर जमीन परस्पर विक्री झाल्याचे प्रकरण !

Mon Jan 9 , 2023
श्री ज्योतिबा देवस्थानची भूमी लुटणार्‍यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावनी मुंबई :- ‘दख्खनचा राजा’ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जे लोक आणि शासकीय अधिकारी सहभागी असतील, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश शासनाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!