संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- २१ व्या शतकातही स्त्री यांच्या जीवनातील प्रत्येक- पैलूवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रभाव जाणवतो.अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त दादासाहेब कुंभारे बहुउद्देश्यीय प्रशिक्षण संस्था येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बरीएम चे कामठी शहर अध्यक्ष दीपंकर गणवीर, जिल्हा उपाध्यक्ष उदास बंसोड़, कामठी सचिव सुभाष सोमकुवार, अनुभव पाटिल, मनीष डोंगरे, उमेश शोमकुवार, गणेश तांबे, विनय बाम्बोडे, मुन्ना नागदेवे यासह बरिएम चे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.