ना जागा, ना टेंडर; तरी नगरसेवकाने थाटले लॉन

नागपूर (Nagpur) : नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्या विरोधकांना अडकवण्याची एकही संधी सोडत नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटी त्यांनी एका नगरसेवकाचे सरकारी जमिनीवर सुरू असेलल्या लॉन आणि काँग्रेसच्याच एका नेत्यांच्या खाजगी कंपनीवर निशाणा साधला आहे.

संबंधित नगरसेवक काँग्रेसचा असून, माजी मंत्री सुनिल केदार यांचा कट्‍टर समर्थक आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विकास ठाकरे यांच्या समर्थकाचा त्याने पराभव केला होता. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा बळकावून तेथ त्याने लॉन टाकला आहे. ठाकरे यांनी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाकडे याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र कोणी दखल घेत नसल्याने त्यांनी थेट सर्वोच्च सभागृहातच ही बाब उघड केली.

दुसरीकडे अंबाझरी उद्यानाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. भाजपच्या कार्यकाळात ही जागा विकसित करण्यासोबतच व्यावसायिक ॲम्युझमेंट पार्कला दिली होती. माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी यासाठी मध्यस्थी केली होती. फुके हेसुद्धा मूळचे काँग्रेसी आहेत. त्यांचे ठाकरे गटासोबत कधीच पटले नाही. त्यामुळे भाजपत प्रवेश करून ते आमदार झाले. फडणवीस यांनी त्यांना आपल्या कार्यकाळात राज्यमंत्री सुद्धा केले होते. फुके यांनी जागा ज्या कंपनीला विकसित करण्यासाठी दिली ते सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे विकास ठाकरे यांना एकाच दगडात दोन पक्षांना मारण्याची आयती संधी चालून आली. ॲम्युझमेंट पार्कचे कंत्राट घेणारे काँग्रेसचे पदाधिकारी हे सुद्धा सुनिल केदार समर्थक आणि ठाकरे विरोधक आहे.

राज्य सरकारने महापालिका आणि सुधार प्रन्यासची संबंधित जागा आपल्या ताब्यात घेतली. ती एमटीडीसीला विकसित करण्यासाठी दिली. त्यानंतर एमटीसीने टेंडर काढून गरुडा नावाच्या कंपनीला विकसित करण्यासाठी दिली. त्यामुळे विकास ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जागेचा करार रद्द करण्याचे बरेच प्रयत्न केले. या दरम्यान जागा विकसित करताना येथील आंबेडकर भवनच्या इमारतीचा काही भाग पाडला. त्यामुळे ठाकरे यांना आयतीच संधी मिळाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

2 हजार ST बस खरेदीसाठी टेंडर तर १७० नवीन चार्जिंग स्टेशन्स

Tue Jan 3 , 2023
नागपूर (Nagpur) : राज्य परिवहन महामंडळाकरिता नवीन बसेस घेण्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त ७०० कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. यातून नवीन ७०० बसेस खरेदी अंतिम टप्प्यात असून, नव्याने २ हजार बसेस खरेदी करण्याची टेंडर प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच शहरी भागात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत असून यासाठी ग्रामीण भागात १७० ठिकाणी बस चार्जिग स्टेशन्स उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री शंभूराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!