रामटेक :- कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक संलग्नित रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक येथील विद्यार्थ्यांची ए.आय.यु. स्पर्धेमध्ये खेळल्या जाणाऱ्या खो खो खेळासाठी निवड झालेली आहे. स्पर्धेत ९ विद्यार्थी खेळणार आहेत.
ए.आय.यु. खो खो स्पर्धेचे आयोजन गोविंद गुरू ट्रायबल विघापीठ बंस्वारा राजस्थान येथे दिनांक ४ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे रागीट महाविद्यालयातील हा संघ नुकताच औरंगाबाद येथे उपविजेता ठरलेला आहे. या संघाचे सर्विकडे कौतुक केले जात आहे. यामध्ये संघ प्रमुख इंद्रजित परतेती, ओमशंकर वाढिवे, अभय वाडीवे, बादल उईके, बंडु धुर्व, स्वप्नील सलामे, रोहित बेंबारे ,पियुष बरबटे, नरेश सलामे, या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष रविकांत रागीट आणि प्राचार्यां जयश्री देशमुख , कुलगुरू डॉ मधुसूदन पेन्ना, कुलसचिव डॉ राम जोशी , डॉ.प्रसाद गोखले , संचालक, शारीरिक शिक्षण व खेळ विभाग डॉ.अमोल मांडेकर , प्रा. संतोष कोल्हे , प्रशिक्षक प्रा, अनिल मिरासे , विभाग प्रमुख प्रा. उर्मिला नाईक, चेतना उके, ज्ञानेश्वर नेवारे, किरण शैद्रे, शालु वानखेडे, कला मेश्राम, निकीता अंबादे, मयुरी टेंभुर्ण, गंगा मोंढे, सुरेश कारेमोरे, गिता समर्थ, राजेंद्र मोहनकर, संदिप ठाकरे, यांनी अभिनंदन केले असुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.