नागपूर : दक्षिण पश्चिम विभागाचे विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हेनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आपले विचार व्यक्त केले. दक्षिण पश्चिम विभाग क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुषार गिऱ्हेची राज ठाकरेंनी मुंबई शिवतिर्थ येथे नागपूर दक्षिण पश्चिम विभागातील विभाग अध्यक्षपदी निवड केली होती. राज ठाकरेंनी नागपूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून प्रमाणपत्र देण्यात आले. नुकत्याच झालेल्या सोहळ्यात सर्वप्रथम दक्षिण पश्चिम विभागातील नियुक्ती पदग्रहण सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी दक्षिण पश्चिम विभागातील अध्यक्ष तुषार गिऱ्हेनी राज ठाकरेंचे स्वागत केले. ठाकरेंचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. विमानळावरून ढोल ताशाच्या गजरात सर्वच कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीची मिरवणूक काढली होती. नियुक्ती पदग्रहण वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या सोहळ्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित केले. त्यावेळी शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे, महेश जोशी, रजनीकांत जिचकार, दक्षिण पश्चिम विभागातील विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, श्याम पुणे, घनश्याम निकाडे, राजू उंबरकर, सरचिटणीस हेमंत गडकरी, अविनाश जाधव आणि प्रवक्ते संदीपभाऊ देशपांडे तसेच आमदार राजू पाटील महिला सरचिटणीस रिटा गुप्ता, या सर्वांची उपस्थिती होती. कार्यक्रमा प्रसंगी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. नागपुरात सोहळा मोठ्या थाटात व हजारोंच्या संख्येत पार पडला असून कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे जंगी स्वागत केले.
राज ठाकरेंनी आपले विचार कार्यकर्त्यांसमोर मांडले. त्यानंतर विदर्भातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले व कार्यक्रमाची सांगता झाली.