महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ अग्रेसर फाउंडेशन तर्फे गणित दिन होणार साजरा..!
नागपूर :- श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ अग्रेसर फाउंडेशनने 22 डिसेंबर रोजी गणित दिन साजरा करण्याची योजना आखली आहे. अग्रेसर फाउंडेशन आणि वि.एन. आय.टि. नागपुर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात 100 पेक्षा अधिक शाळांनी टेबल स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धेत वर्चुअल रुपात अमेरिकेततुन सुध्दा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. Wall Painting या उपक्रमा अंतर्गत नागपूर शहरात धरमपेठ सायन्स कॉलेजची भिंत रंगवण्यात आली आहे. या उपक्रमासाठी नागपूर महानगर पालिका, नागपूर, साऊथ सेंट्रल कल्चरल झोन, नागपूर आणि धरमपेठ महाविद्यालय सहकारी प्रत्यय संस्था मर्यादित नागपूर यांच्या वतीने आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे. रंगवलेल्या भिंती प्रत्येक बालमनाला गणिताच्या जगाशी जोडतील. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी आपण २२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतो.
या वर्षी अग्रेसर फाउंडेशनच्या वतीने महान गणितज्ञांच्या स्मरणार्थ आणि राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यासाठी ‘बे एके बे’ या कार्यक्रमांतर्गत भव्य टेबल पठण स्पर्धा दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी चिटणीस पार्क मैदान, महाल नागपुर येथे सकाळी ८ ते ९ः३० दरम्यान होणार आहे. कार्यक्रमाला प्रामुख्याने नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी.प्रमोद पडोळे -डायरेक्टर वि.एन.आय.टी.संजय भेंडे अध्यक्ष-नागपुर नागरिक सहकारी बँक उपस्थित रहाणार आहे. अग्रसेर फाउंडेशन च्यावतीने आज पियुष बोईनवर यांच्या अध्यक्षतेत पत्रकार परिषद संपन्न झाली असून यावेळी पियुष बोईनवार, मिलिंद भाकरे, संकेत दुबे, रक्षल ढोके, अनिकेत पोटे, तुषार गजभिये, प्रतीक कांबे यावेळी उपस्थित होते.