वाडी पोलिसात तक्रार दाखल,कार्यवाहीची मागणी!
वाडी :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल अतीशय खालच्या पातळीवर शिवीगाळ करून संपुर्ण महाराष्ट्र व देशात अशांतता निर्माण करणाऱ्या जगदीश गायकवाड नामक व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता १८६० च्या कलम ५००,५०१,५०५-२B, १५३A, ५०४ व ५०६ (भाग २) कलमा खाली तक्रार दाखल करून त्वरीत कठोर कारवाई करावी याकरीता वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी वाडी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.
यावर कठोर कारवाई न झाल्यास आंबेडकरी समाजाच्या रोषाला सामोरे जाण्यासह आंदोलनात्मक जनउठाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. करिता त्वरीत जगदीश गायकवाड या समाजकंटका विरोधात FIR दाखल करून कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी तक्रारीत करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नागपूर जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे,जिल्हा सचिव अतुल शेंडे,जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाणे,सामाजिक कार्यकर्ते मनीष बोरकर, महिला आघाडी जिल्हा सल्लागार लता म्हैसकर,जिल्हा सचिव महानंदा राऊत,रीता उमरेडकर (सरपंच, दवलामेटी),विनय उमाठे, अमित वानखेडे,रोहित राऊत,मनोहर गजभिये, सूनिता बोरकर,माया रामटेके, सुष्मा निमसरकर, साधना नितनवरे,आशा दूपारे इत्यादी कार्यकर्ते उपास्थित होते.