नागपुर :- कोसरे कलार समाजाच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा समाज भवन संकल्प मेळावा दि. 27 नोवेंबर रविवार ला, सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत, संत जगनाडे चौक “गायत्री शक्तीपीठ” नंदनवन नागपूर येथे आयोजित केले आहे. या मेळ्याव्याचे उद्घाटन दीपक जयस्वाल प्रसिद्ध उद्योगपती, डॉ.शरद निंबाळकर माजी कुलपती पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, यांच्या अध्यक्षतेखाली व विशिष्ट अतिथी दयाराम राय राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कस्तुरी जयस्वाल समवर्गीय सभा, झाशी, चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र मंच रामटेक डॉ. कृष्णा राऊत ब्रह्मपुरी, केशवराव मानकर माजी आमदार, अविनाश वारजूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल.
या मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपवर- वधू युवक- युवती गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, जळगाव, नाशिक, कल्याण, मुंबई, राजनंदनगांव, छिंदवाडा, बैतूल, जिल्ह्यातून भाग घेणार आहे. असे आयोजकांनी म्हटले आहे. मेळाव्याची विशेषता म्हणजे समाज भवन वस्तीगृह व रोगी लोकांसाठी आश्रयस्थान निर्माण करणे हा उद्देश आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने समाज बांधवांनी लाभ घेण्यात यावा. असे आयोजकांनी व संस्थापक अध्यक्ष फाल्गुन शंकर उके यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .