दुचाकी अपघातात दुसऱ्या तरुणाचाही उपचारार्थ मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्गावरील कामठी येथील प्रबुद्ध नगर जवळील महादेव डेली निडस समोरून नागपूर हुन नागसेन नगर स्वगृही भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकी क्र एम एच 40 सी एन 5929 च्या स्वाराने समोरील दुचाकी ला ओव्हरटेक करण्याच्या बेतात दुचाकीला धडक दिल्याची घटना गतरात्री साडे सात दरम्यान घडली होती. घडलेल्या या गंभीर अपघातात दुचाकीस्वार तरुण धमेश गजभिये वय 27 वर्षे रा नागसेन नगर कामठी चा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी वर बसलेले इतर दोन तरुण गंभीर जख्मि होत मृत्यूशी झुंज देत होते त्यातील एका तरुणाचा आज नागपूर च्या शासकोय रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतक तरुणाचे नाव हिमांशू लोणारे वय 20 वर्षे रा नागसेन नगर कामठी असे आहे. तर यातील तिसरा अपघाती जख्मि , तेजस कडबे वय 20 वर्षे राहणार नागसेन नगर कामठी हा धोक्याबाहेर असून कामठी च्या आशा हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.तर या घटनेने नागसेन नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कल्याणकारी राज्याची संकल्पना पूर्णत्वास नेणारा अर्थसंकल्प - संदीप जोशी

Tue Feb 27 , 2024
नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील कल्याणकारी राज्याची संकल्पना पूर्णत्वास नेणारा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केल्याची प्रतिक्रीया माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे. युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांच्या विकासासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी राज्य सरकारने केल्याचेही त्यांनी नमूद केले. यासोबतच विदर्भातील गोसेखुर्द येथे जलपर्यटन प्रकल्पाचा विकास, विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com