नागपूर :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी मुंबईला जाऊन अभिवादन करणाऱ्या लाखो अनुयायांना थांबवण्यासाठी, तसेच मागील अनेक वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या इंदू मिलच्या जागेवरील डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाचे बींग फुटू नये या भीतीपोटी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेल मंत्रालयाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचे षडयंत्र केले. षडयंत्राचा भाग म्हणून 3 डिसेंबर ते 6 डिसेंबरच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या रद्द केल्या. त्या गाड्या पूर्ववत सुरू कराव्या यासाठी बसपा उद्या डी आर एम च्या माध्यमातून रेल मंत्रालयाला निवेदन देणार आहे.
बसपाचे म्हणणे आहे की 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर च्या दरम्यान सर्व रेल गाड्या जैसे थे सुरू ठेवाव्या व रिमॉडेलिंग किंवा नॉन इंटरलॉकिंग चे काम 10 ते 13 डिसेंबरच्या दरम्यान करावे. या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार व मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर (जी एम) मुंबई यांना नागपूर विभागाचे मंडल रेल प्रबंधक (डीआरएम) च्या माध्यमातून निवेदन पाठविल्या जाणार आहे.
त्यासाठी शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) मध्य रेल नागपूर ऑफिस येथे बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम व मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.
@फाईल फोटो