स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ आता मिळणार दरमहा २० हजार रुपये

मुंबई :- राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे.

या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे ७४.७५ कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील ६२२९ स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होईल.

भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम अशा देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सन १९६५ पासून सुरु केली आहे. त्यानुसार २ ऑक्टोबर २०१४ पासून दरमहिन्याला १० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जल्द ही थैलेसीमिया व सिकल सेल मरीजों की समस्या का समाधान होगा : जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटानकर

Fri Nov 18 , 2022
नागपूर :- थैलेसीमिया एंड सिकलसेल सेंटर रुघवानी अस्पताल, जरीपटका, नागपुर में बाल दिवस मनाया गया। थैलेसीमिया और सिकलसेल रोग से पीड़ित सभी रोगियों और बच्चों ने इस उत्सव में भाग लिया। इस अवसर पर नागपुर के जिलाधिकारी डॉ. विपिन इटानकर एवं जिला परिषद के मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुम्बेजकर अतिथि थे। कार्यक्रम के संयोजक थैलेसीमिया एंड सिकलसेल सोसाइटी ऑफ इंडिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com