फ्रीडम राईडर बाईक रॅलीचे नागपूरमध्ये स्वागत ७५ बाईकर्सचा २५ हजार किलोमिटरचा प्रवास

नागपूर :- आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या 75 बाईकर्सचा ताफा 25 हजार किलोमीटरच्या प्रवासादरम्यान नागपूर येथे आज पोहोचला. नागपूरच्या क्रीडा जगताने या धाडसी प्रवाशांचा उत्साहात सन्मान केला. केंद्र व राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया मोटारबाईक एस्पिटिशन (AIME) यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ७५ बाईकर्स हे देशातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार असून या रॅलीच्या माध्यमातून विविधतेतील एकता असणा-या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून हे सर्व ७५ बाईकर्स स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना आरोग्य आणि फिटनेस चा संदेश प्रसारित करुन भारतीय वारसा तसेच संस्कृती यावर एक माहितीपट तयार करणार आहेत. सदर मोहिम ही एकूण ७५ दिवसांची असून देशातील ३४ राज्य व केंद्रशासित प्रदेश मधील एकूण २१,००० कि.मी. च्या प्रदेशामध्ये ही मोहिम चालविणार आहेत.

बाईकर्सची रॅली ही पहिल्या टप्यात भंडारा येथून नागपूरला आली असून नागपूर येथे झिरो माईल व राजभवन स्थळी भेट दिली. भारताचा मध्यबिंदू असणाऱ्या झिरोमाइल येथील भेटीनंतर या बाईकर्सनी आनंद व्यक्त केला. देशाच्या मध्यबिंदूवरील स्वागताने आम्ही सद्गतीत झालो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे या रॅलीतील सहभागी तरुणांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.

विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड मानकापूर नागपूर येथे द्रोणाचार्य व अर्जुन पुरस्कारार्थी  विजय मुनिश्वर, डॉ. शरद सूर्यवंशी, संचालक क्रीडा विभाग रा.तु.म. नागपूर विद्यापिठ नागपुर, तसेच सहायक संचालक भारतीय खेळ प्राधिकरचे श्रीनिवास माळेकर, सहायक संचालक सुमेध तरोळेकर, वरिष्ठ मार्गदर्शक आशिष बॅनर्जी, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाईकर्सचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.

स्वागत समारंभानिमीत्त यशस्वी अनिल मोरे, ई जनरेशन गृप, काटोल हीने कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर अमित हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर योगासाने सादर केली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गांधीनगर, गुजराथ येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल गेम्स मध्ये नागपूर जिल्हयातील सहभागी झालेल्या १३ खेळाडूंचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पल्लवी धात्रक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  माया दुबळे, क्रीडा अधिकारी यांनी केले. तर सहायक संचालक, भारतीय खेळ प्राधिकरचे श्रीनिवास माळेकर यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - ईपीएफो प्रादेशिक कार्यालय, नागपूरद्वारे विशेष अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छता मोहीम

Mon Oct 31 , 2022
नागपूर  :- केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत रघुजी नगर, दक्षिण नागपूर येथे स्थित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना –ईपीएफओ , प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयुक्त शेखर कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व शासकीयकामांचा निपटारा आणि प्रलंबित प्रकरणे आणि विशेष अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com