मी संविधान, कायदा मानणारा त्यामुळे जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी – अजित पवार

मुंबई :- मी एक या देशाचा नागरिक आहे. मी संविधान, कायदा मानणारा आहे त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

पुन्हा एकदा तुमची चौकशी होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हे प्रकरण २०१२ पासूनचे आहे. प्रत्येकवेळी अजित पवारांचे नांव येते. अजित पवार आणि ७५ लोक मात्र त्या ७५ लोकांची नांवे येत नाही फक्त अजित पवार यांचे नाव, फोटो, हेडलाईन होते. मात्र त्यांचे सरकार आहे काय चौकशी करायची ती करा असेही अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

माझी चौकशी सहकार विभागामार्फत, निवृत्त न्यायाधीशांमार्फत, सीआयडी, एसीबी आणि आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली मात्र आता आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग चौकशी करणार अशी पुन्हा बातमी कानावर आली आणि तुमच्या माध्यमातून वाचली, पाहिली परंतु याबाबत मला माहिती नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाप्रज्ञा बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती निमित्ताने मान्यवरांचा सत्कार !

Tue Oct 18 , 2022
बुद्ध आणि आंबेडकरांचे विचारच समाजाला दिशादर्शक – अशोक बागुल वाडी :- अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने दाभा येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारात भदंत संघकीर्ती थेरो यांच्या आयोजनात सम्पन्न वर्षावासाची समाप्ती एका विशेष कार्यक्रमाने संपन्न झाली. सर्वप्रथम भिख्खू संघाच्या उपस्थितीत उपासक-उपासिकांनी सकाळी महापरित्राण पाठ व बुद्ध वंदना ग्रहण केली. तद्नंतर भिख्खू संघाला भोजनदाना नंतर उपस्थित भदंत महापंथ,भदंत संघकीर्ती महाथेरो,भदंत शीलपंथ महाथेरो, प्रियदर्शनी महाथेरो, शिलरक्षित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com