संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
‘नारे तकबिर अल्ला हो अकबर’ च्या गजरात दुमदुमले कामठी शहर
ईद ए मिलादुनब्बी निमित्त निघाली शांती यात्रा मिरवणूक
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विश्व शांतीचे प्रणेते मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती जशने ईद ए मिलादुननबी या उत्सवानिमित्त आज 9 आक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता मौलाना मो अली जोहर मंच येथून मरकजी सिरतूननबी कमिटी च्या वतीने भव्य शांती मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उदघाटन माजी मंत्री सुनील केदार, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत,माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी, रतनलाल बरबटे, मो आबीद भाई ताजी, इकबाल अहमद, अश्फाक कुरेशी, इकबाल भाई ताजी, नियाज अहमद, अजय कदम,नौशाद सिद्दीकी, संजय कनोजिया, श्रावण केळझरकर, कमिटी अध्यक्ष जालली बावा, महासचिव इकबाल कुरेशी, सहसचिव नूर मोहम्मद नूरी,संयोजक नियाज कुरेशी, अक्रम याकूब शेख, हाजी नासिर भाटी, मो जाफर अलीमुद्दीन तंवर, फारूक शब्बीर,राजेश खांनवाणी,आदी मान्यवर उपस्थित होते. या मिरावणुकीतून अनुयायांनि काढलेल्या ‘नारे तकबिर अल्ला हो अकबर’ च्या गजरात कामठी शहर दुमदुमले .
या मिरवणूकीतून मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या विश्वशांतीचा संदेश देण्यात आला. तर ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत असता चौका चौकात ठिकठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने मिरवनूकीतील अनुयायांना स्वागत करीत पाणी ,शरबत,मिठाई, अल्पोहार आदी वितरण करण्यात आले. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गानी भ्रमण केल्यानंतर मौलाना मो अली जोहर मंच येथे समापन करण्यात आले. त्यानंतर विश्व शांती भारताला जगात योग्यस्थान मिळावे तसेच भारतात बंधू भाव , एकता राहावी यासाठी समस्त मुस्लिम बांधव एकत्र प्रार्थना केली तसेच मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकीत धार्मिक प्रवचन करण्यात आले .व दुपारी 2 वाजता परचंम कुशाई करीत या महाआनंदाणे या उत्सवाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत मरकजी सिरतुनब्बी कमिटी चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थित होते. तर ही मिरवणूक यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी डीसीपी सारंग आव्हाड, यांच्या मार्गदर्शनार्थ जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे , नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.