हद्दपार आरोपी विजय उर्फ टायसन डोंगरेस अटक 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारे कॉलोनी रहिवासी सराईत गुन्हेगार विजय उर्फ टायसन डोंगरे वय 44 वर्षे ला डीसीपी सारंग आव्हाड यांनी एक महिन्यांपूर्वी 2 सप्टेंबर ला तीन महिन्यासाठी कामठीतुन हद्दपार केले होते मात्र सदर हद्दपार आरोपी हा सदर आदेशाचे उल्लंघन करून चंद्रमनी नगर परिसरातील रेल्वे लाईन जवळ फिरकत असल्याने सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याविरुद्ध कलम 142 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची कारवाही नवीन कामठी पोलिसांनी 4 ऑक्टोबर ला दुपारी 3 दरम्यान केली.

प्राप्त माहितीनुसार सदर आरोपी हा नेहमी आपले साथीदारांसह राहून वस्तीत लोकांना दमदाटी दाखवणे तसेच जबरदस्तीने चोरी करने, अवैध दारू विक्री करणे, एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हे इत्यादी प्रकारचे भारतीय दंड संहिता मधील प्रकरणं सोळा ते सतरा अनव्ये शिक्षेस पात्र गुन्हे सवयीचा असून त्याच्यावर निर्दिष्ट केलेल्या सवयीमुळे परिसरात प्रचंड भीतीमय व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसाकडून बरेचदा समज देऊनही सदर आरोपी समजण्याच्या पलीकडे असल्याने परिसरातील शांतता ,कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या उद्देशातून डीसीपीच्या आदेशनव्ये हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले होते. यानुसार सदर इसमास नागपूर शहर पोलिस आयुक्तलय, नवीन कामठी पोलीस स्टेशन, तसेच पोलीस स्टेशन खापरखेडा,मौदा व कन्हान सिमेतून हद्दपार करण्यात आले होते मात्र आरोपी ने सदर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही यशस्वी कारवाही पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनार्थ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले, राजू टाकळकर, श्याम गोरले, आशिष फुरकुंडे यांनी केली .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी विकास विभागाकडून कर्तबगार महिलांचा गौरव

Thu Oct 6 , 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम नागपूर :- विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एक आगळावेगळा आदिशक्ती सन्मान सोहळा आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित केला होता. वनामती येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी-कर्मचारी महिलांनीच सांभाळली आणि हा सोहळा यशस्वी केला, हेही या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com