संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत येणाऱ्या खापरखेडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एका महिला पोलीस कर्मचारीने घटस्फोट व पतीने केलेले दुसरे लग्न च्या नैराश्येतून आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली असून वेळीच मदतीचे सहकार्य मिळाल्याने जीवितहानी टळली तर आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव प्रीती बलदेव अहिरकर वय 31 वर्षे रा क्वार्टर नं 185/1, प्रकाशनगर, खापरखेडा असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी महिला पोलिस कर्मचारी ही पतीशी झालेला घटस्फोट व त्यानंतर पतीने केलेले दुसरे लग्न या नैराश्येतून नेहमी मानसिक तणावात असायच्या याच मानसिक तणावातून आज दुपारी जेवणाच्या वेळी 2 दरम्यान पोलीस स्टेशन मधुन राहत्या क्वार्टर मध्ये जेवण करण्यासाठी गेले असता मानसिक तणावातून स्वतःचा जीवन संपवण्याचा मनात ध्येय बाळगून घरात ठेवलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच सहकाऱ्यांनी मदतीची धाव घेतली व उपचारार्थ कामठी च्या आशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नवीन कामठी पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.