अमरदिप बडगे, प्रतिनिधी
सर्वांना गोंदिया च्या सामान्य रुग्णालयात भरती
गोंदिया – जिल्ह्यातील टिरोडा तालुका अंतर्गत येत असलेल्या परसावडा येथील बावनकर कुटुंबीय रात्री झोपले असता अचानक मध्य रात्री भिंत पडल्याने बावनकर यांच्या कुटुंबियातील तिन जन गंभिर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालया उपचारा साठी भर्ती करण्यात आले आहे. जखमी झाल्या मध्ये रामजी बावनकर ५५ वर्ष, श्यामाकला बावनकर ५० वर्ष, सुरुची बावनकर १९ वर्ष हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत, तर निखिल बावनकर २३ वर्ष हा किरकोळ जखमी झाला आहे.