“युवा मोर्चा ने विद्यापीठाची मैनेजमेंट काउंसिल ची बैठक उधळुन लावली”
नागपुर – भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराद्वारे आज नागपुर विद्यापीठावर आंदोलन करण्यात आले. कोणालाही विश्वासात न घेता या शैक्षणिक वर्षापासुन २०% फी वाढ करण्यात आली होती. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेता आता कुठे सर्व वातावरण स्थिर स्थावर होत आहे. तसेच संपुर्ण पुर्व विदर्भावर ओल्या दुष्काळाचे सावट देखील आहे. अश्या परिस्थितीमध्ये २०% फी वाढ ही विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अतिशय मोठा भुरदंड असु शकतो. हा विषय घेऊन आज भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीने हे आंदोलन केले. आज पासुन १० दिवसांच्या अगोदर भाजयुमो विद्यार्थी आघाडीने विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंना निवेदन दिले होते. पण त्यावर विद्यापीठाने काहीही कारवाही केलेली नाही. ॲडमिशनचे दिवस येऊ लागललेले आहेत तरीही काही निर्णय विद्यापीठ घेतांना दिसत नव्हते. आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीची बैठक होती. भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट व्यवस्थापन समितीच्या बैठकीतच धडक दिली व असा आग्रह केला की बैठकीत अगोदर फी वाढीचा निर्णय घ्यावा व नंतर इतर मुद्यांवर चर्चा करावी. कुलगुरूंनी विनंती मान्य करून व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अगोदर फी वाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली व ही माहिती युवा मोर्चाला कळवली व नंतर पुढील बैठकीला सुरवात केली.
आजच्या आंदोलनाला प्रमुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले , प्रदेश सदस्य देवा डेहणकर, रितेश राहाटे, शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, निलेश राऊत, सन्नी राऊत, पंकज सोनकर हे उपस्थित होते.
आंदोलन भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे शहर संयोजक संकेत कुकडे यांच्या नेतृत्वात झाले. सोबत सह-संयोजक गौरव हरडे, सुभाष खेमानी, आशिष मोहिते, शिवाम पंढरीपांडे, प्रशांत बघेल, साहिल गोस्वामी, प्रणित पोचमपल्लीवार, कौस्तुभ बैतुले व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.