संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25 : कामठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नुकतेच करण्यात आलेल्या होर्डिंग हटाव मोहिमेत कांग्रेसचे होर्डिंग काढून धन्यता मानली तर त्याच तुलनेत भाजप बरीएम संघटनांचे होर्डिंग अजूनही कायम आहेत यावरून कामठी नगर परिषद प्रशासनाची भेदभावपूर्ण कार्यवाही दिसून येते.कामठी नगर परिषद प्रशासनाच्या या पक्षपाती भूमिकेच्या विरोधात आज कांग्रेसतर्फे नगर परिषद प्रशासनाला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
हे सामूहिक निवेदन कामठी मौदा विधानसभा चे नेता व माजी जिला परिषद अध्यक्ष.सुरेश भोयर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे विदर्भ जोन युनिट मॅनेजमेंट कोर्डिनेटर मो.इरशाद शेख, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे महासचिव अनुराग भोयर यांच्या मार्गदर्शनात नागपुर जिला ग्रामीण युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मो.राशीद अंसारी यांच्या नेतृत्वात देण्यात आले व कार्यवाही झाल्यास नगर परिषद परिसरात उपोषन करून तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सेवादलचे सहसचिव राजकुमार गेडाम , राजेश कांबळे जी, कर्रार हैदर , शहर सेवादल चे अध्यक्ष सुलतान अशरफी , प्रकाश लाइनपांडे ,मंजुताई मेश्राम,शहर महिला कांग्रेस अध्यक्ष सुरैया बानो,शेख आसिफ,शेख अहसान आदी प्रमुखता ने उपस्थित होते.