संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी –
अटक आरोपिकडून चोरीस गेलेला 1 लक्ष 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राम मंदिर कडे जाणाऱ्या मार्गावरील भक्ती ट्रान्सपोर्ट समोर उभी असलेली दुचाकी 7 ऑगस्ट ला दिवसाढवळ्या सकाळी आठ वाजता चोरीस गेल्याची घटना घडली असता यासंदर्भात फिर्यादी यशवंतराव खुल्लरकर वय 61 वर्षे रा प्रगतीनगर रणाळा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करीत तपासाला गती देण्यात आली .या तपासाला तर्कशक्तीच्या आधारावर अवघ्या चार दिवसात आरोपीचा शोध लावण्यात जुनी कामठी पोलीस विभागाला यशप्राप्त झाले असून आरोपीचा शोध लावून आरोपीस अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव शेख सोहेल उर्फ मोनू शेख वालीद वय 24 वर्षे रा पुराना भोईपुरा कामठी असे आहे .अटक आरोपीने जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत अजून एका ठिकाणी केलेली घरफोडी तसेच पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या घरफोडी ची कबुली दिली.यानुसार आरोपिकडून तीन चोरीच्या घटनेचा पर्दाफाश करण्यात आला.अटक आरोपी कडून तिन्ही घटनेतील चोरीस गेलेले 1 लक्ष 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपिकडून तिन्ही चोरी प्रकरणातील मुद्देमालात ऍक्टिवा दुचाकी क्र एम एच 49 पी 9629, किमती 35 हजार रुपये, चॉकलेटी रंगाची ज्युपिटर क्र एम एच 40 क्यू 7476 किमती 40 हजार रुपये, टिव्हीएस कंपनीची काळ्या रंगाची मोपेड क्र एम एच 31 डी पी 3853 तसेच सोन्या चांदीचे दागिने व नगदी 1 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी सारंग आव्हाड, एसीपी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे , डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, डी बी स्कॉड चे संजय गीते, महेश कठाने, रवी गावंडे,श्रीकांत भिष्णुरकर,अश्विन चहांदे, विवेक दोरसेटवार,अश्विन चहांदे यांनी केली .