संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विहीरगाव मार्गावर ट्रक क्र एम एच 31 सी जी 4781 चा चालक हा ट्रक च्या बाजूला उभा असताना मागेहून येत असलेल्या ट्रक कंटेनर क्र एम एच 46 बी एफ 8508 च्या चालकाने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या गंभीर अपघातात जख्मि होऊन मृत्यू पावल्याची घटना गतरात्री साडे बारा दरम्यान घडली असून मृतक ट्रक चालकाचे नाव जितेंद्र शुक्ला वय 43 वर्षे रा कन्हान असे आहे तर या घटनेतील आरोपी ट्रक कंटेनर चालक अक्कलउद्दीन अहमद अली वय 26 मालतूर उत्तरप्रदेश विरुद्ध भादवी कलम 279, 338, 304 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.